येळ्ळूरमध्ये वाढला तणाव, बेळगावात कन्नडीगांचा धुमाकूळ

belgum
बेळगाव – बेळगावात कन्नड रक्षण वेदिका या संघटनेचे हजारो कार्यकर्ते दाखल झाले असून त्यांचा बेबंद धिंगाणा सुरू झाल्यामुळे येळ्ळूर येथेही तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा दोन्ही शहरांमध्ये तैनात करण्यात आला आहे. संघटनेचा अध्यक्ष नारायण गौडा याला खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात येळ्ळूरमधील मराठी बांधवांना कानडी पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी कानडी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने पुरावे सादर करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment