माजी पोलीस आयुक्तांना 8 लाखांचा दंड

sataypal
मुंबई : मुंबई पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना नोटीस बजावली असून मलबार हिल येथील सरकारी बंगला आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर न सोडल्यामुळे ही नोटीस मुंबई पोलिसांनी बजावली आहे. त्यातच सत्यपाल सिंह यांना 8 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सत्यपाल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा जानेवारी 2014 मध्ये दिला. त्यावेळी त्यांना सरकारी निवासस्थान खाली करणे गरजेचे होते. मुंबई पोलिसांकडून सिंह यांनी सरकारी बंगला न सोडल्याने 8 लाख रुपयाचा दंड लावण्यात आला आहे. सेवेतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सिंह यांनी भाजपाकडून उत्तरप्रदेशमधील बागपतमधून लोकसभा निवडणूक लढविली आली खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Leave a Comment