मोहंमद अलीच्या ग्लोव्हजचा 4 लाख डॉलर्सला लिलाव

mohmmad
डल्लास – 1971 साली जो प्रेझरला जे ग्लोव्हज घालून जागतिक दर्जाचा माजी मुष्टियोद्धा मोहंमद अली उर्फ कॅशियस क्ले याने पराभूत केले होते त्या बॉक्सिंग ग्लोव्हजचा लिलाव करण्यात आला आहे. हे ग्लोव्हज 4 लाख डॉलर्स बोली लावून एका व्यक्तीने खरेदी केले. मात्र या व्यक्तीचे नाव उघड होऊ शकले नाही. जो प्रेझर आणि मोहंमद अली यांच्यातील ही लढत शतकातील सर्वोत्तम म्हणून गणली गेली. टेक्सासच्या एका राष्ट्रीय क्रीडा साहित्य केंद्रातर्फे हा लिलाव आयोजित केला होता. 1964 साली मोहंमद अलीने पहिली विश्व जेतेपदाची लढत जिंकली होती. या लढतीवेळी वापरण्यात आलेल्या ग्लोव्हजचा लिलाव करण्यात आला होता आणि हे ग्लोव्हज 836,500 डॉलर्सना खरेदी करण्यात आले होते.

Leave a Comment