अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून ली ना ची माघार

li-na
वॉशिंग्टन – येत्या 25 ऑगस्टपासून न्युयॉर्कमध्ये सुरू होणाऱया अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला टेनिसपटूंच्या क्रमवारीत दुसऱया स्थानावर असलेल्या चीनच्या ली ना हिला दुखापत झाल्याने ती सहभागी होऊ शकणार नाही, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

मार्चमध्ये 32 वर्षीय ली ना हिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीवर तिने वैद्यकीय उपचार घेतले. पण अद्याप ती पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकली नाही. गेल्या जानेवारीत ली ना हिने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. तिने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत दोन ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत. डॉक्टरांनी तिला आणखी किमान दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ती अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

Leave a Comment