
पुणे : संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांनी ‘प्लँचेट’ प्रकरणाचे समर्थन करीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी ‘प्लँचेट’चा आधार घेणे यात गैर काहीच नसल्याचे वक्तव्य केले आहे. तर, अंनिसनेही डॉ. भटकर यांना या माध्यमातून तपास करणे शक्य असल्याचे सिध्द करण्याचे आव्हान दिले आहे.
भटकरांकडून ‘प्लँचेट’ प्रकरणाचे समर्थन
डॉ. भटकर यांनी परदेशात पोलिसांकडून तपास करताना ‘प्लँचेट’चा आधार घेतला जात असल्याचे वक्तव्य केले होते. खुनाचा तपास ‘प्लँचेट’चा आधार घेऊन करणे शक्य आहे, अंनिसने भटकर यांचे वक्तव्य समाजाची दिशाभूल व वैज्ञानिक दृष्टीकोनाची प्रताडणा करणारे असल्याचा टोला लगावला आहे. तसेच अंनिसने ‘प्लँचेट’ मार्फत तपासाच्या सिध्दतेसाठी 21 लाखाचे बक्षीस देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ‘प्लँचेट’ प्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशाराही अंनिसने दिला आहे.
