अन्य बँकांच्या एटीएममधून आता काढू शकता फक्त दोन वेळाच पैसे

atm
मुंबई : शहरांमध्ये आपले खाते ज्या बँकेत आहे त्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागणार असून भारतीय रिझर्व बँकेने अन्य बँकेच्या एटीएममधून आता फक्त दोन वेळाच फुकट पैसे काढू शकता. त्यापूढे प्रत्येक वेळेस 20 रुपये आकारले जातील असे निर्देश जारी केले आहेत.

मात्र यातून ग्रामीण भागातील एटीएम धारकांना सुट देण्यात आली असून अन्य बँकांच्या एटीएममधून ग्रामीण भागातील एटीएम धारकांना पाच वेळा फुकट पैसे काढता येणार आहेत. आरबीआयने हा निर्णय अन्य बँकांची मागणी लक्षात घेता घेतल्याचे समजते. अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची ग्राहकांना दिलेली सुट ही त्या बँकेला नुकसानकारक ठरत असल्याचे मत खासगी बँकांनी आरबीआयकडे व्यक्त केले होते. त्यामुळे ग्राहकांना दिलेली सुट कमी करण्याची मागणी या बँकांनी केली होती.