आतापर्यंत माळीणच्या ढिगाऱ्यातून काढले 73 मृतदेह

malin
पुणे : माळीणच्या घटनेला तीन दिवस उलटले असून अजूनही बचाव कार्य सुरूच आहे. ढिगा-याखालून आज सकाळपर्यंत 73 मृतदेह काढण्यात आले आहेत. ढिगा-याखाली आणखी शंभरजण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

डोंगरकडा कोसळून अख्ख माळीणगाव तीन दिवसांपूर्वी डोंगराच्या ढिगा-याखाली गाडले गेले. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने अहोरात्र बचाव कार्य सुरू आहे. मात्र बचाव कार्यात मुसळधार पाऊस आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे अनेक अडचणी येत असून परिसरात मोठयाप्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने एनडीआरएफच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी सकाळपर्यंत 73 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. यामध्ये 25 पुरूष, 28 महिला आणि 10 लहान मुलांचा समावेश आहे. वाचलेल्या 10 जणांवर मंचरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याच पार्श्वभूमीवर माळीण भुस्खलनाची कारणे शोधण्यासाठी भुवैज्ञानिक सर्व्हेक्षण पथक शनिवारी माळीणमध्ये येत आहे. हर्बन सिंग, असिम शहा, व्यंकटस्वामी, शेखर सरकार, आणि एम. एम. पवार या भुगर्भशास्त्रज्ञांचा पथकात समावेश आहे. या पथकाकडून दुर्घटनाग्रस्त भागाच्या पाहणीचा अहवाल केंद्राला सादर करण्यात येणार आहे.

Leave a Comment