स्टॅनफोर्ड टेनिस स्पर्धेत सेरेनाची विजयी सलामी

serena
स्टॅनफोर्ड – अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन स्पर्धेनंतर पहिल्यांदाच येथे सुरू असलेल्या स्टॅनफोर्ड खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत आपला सहभाग दर्शविताना विजयी सलामी दिली तर लिपचेंकोने रॅडव्हेन्स्काला पराभवाचा धक्का दिला.

विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीतच अग्रमानांकित सेरेनाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर तिने प्रकृती नादुरुस्तीमुळे या स्पर्धेच्या दुहेरीतून माघार घेतली होती. सेरेनाला स्टॅनफोर्ड स्पर्धेतील पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली होती. दुस-या फेरीतील सामन्यात 64 मिनिटांच्या कालावधीत झेकच्या प्लिसकोव्हाचा 7-5, 6-2 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात लिपचेंकोने पोलंडच्या रॅडव्हेन्स्काचा 6-3, 3-6, 6-4 असा पराभव केला. अमेरिकेच्या व्हिकेरीने प्युएगचा 6-7 (4-7), 6-2, 6-1, असा पराभव केला. पेटकोव्हिकने ओसाकावर 6-2, 6-2 अशी मात केली.

Leave a Comment