अमेरिकेच्या जॉन्सनकडून इस्नेर पराभूत

tennis
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनने आपल्याच देशाच्या जॉन इस्नेरचा येथे सुरू असलेल्या सिटी खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत पराभव करून खळबळ माजवली. तर सॉक विरुद्ध विजयासाठी कॅनडाच्या रेओनिकला कसरत करावी लागली. अमेरिकेच्या सॅम क्वेरीचे आव्हान जपानच्या निशीकोरीने संपुष्टात आणले.

या हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत स्टीव्ह जॉन्सनने जॉन इस्नेरचा 6-7 (5-7), 6-3, 7-6(8-6) असा पराभव केला. झेकचा बर्डीच तसेच कॅनडाचा रेओनिक आणि जपानचा निशीकोरी यांनी अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. रेओनिकने जॅक सॉकचा 7-6 (7-3), 7-6(7-3) तसेच निशीकोरीने सॅम क्वेरीचा 6-4, 5-7, 6-4, झेकच्या बर्डिचने गिनेप्रीचा 6-1, 6-4, बर्गोसने लोपेझचा 7-6, (7-5), 6-4, अमेरिकेच्या डोनाल्ड यंगने बेनातेयूचा 6-4, 6-3 असा पराभव केला. महिलांच्या विभागात मॅलेडेनोव्हिकने अमेरिकेच्या टाऊनसेंडचा 6-3, 6-4 असा पराभव करून पुढील फेरी गाठली.

Leave a Comment