राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत बक्षिसांचा पाऊस

carrom
मुंबई – १४ ते १७ ऑगस्ट २०१४ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य मानांकन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेला बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रायोजकत्व लाभले असून, जवळपास दोन लाखाची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पुरुष एकेरीतील विजेत्याला ६० हजार तसेच महिला एकेरीतील विजेत्याला ३० हजार रुपये मिळतील.

निको एसी हॉल, नायगाव क्रॉस रोड, सहकार नगर समोर, वडाळा (पूर्व) येथे पुरुष आणि एकेरी या दोन गटात होणा-या स्पर्धेत राज्यातील १८ जिल्हय़ांमधून किमान साडेसहाशे कॅरमपटू सहभागी होतील.

स्पर्धेबाबतची सर्व माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवेशिका शुक्रवापर्यंत (१ ऑगस्ट) स्वीकारल्या जातील.

Leave a Comment