बाजारात लवकरच सुझुकीची 155 सीसी बाईक

suzuki
नवी दिल्ली : येत्या 10 ऑगस्टला भारतीय बाजारपेठेत सुझुकीची 155 सीसी गिक्सर ही नवी बाईक दाखल होणार असून त्यासाठी कंपनीकडून ऍडव्हांस बुकींग सुरू करण्यात आले आहे. या गाडीचे बुकींग अवघ्या पाच हजार रूपयात करता येणार आहे.

फ्यूज एफिशियंसी आणि सुझुकी इको परफॉर्मंस टेक्नोलॉजीचा या बाईकमध्ये वापर करण्यात आला असून या बाईकची किंमत दिड लाख रूपये आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या ऑडो एक्सपोमध्ये कंपनीचा ब्रँड ऍम्बेसेडर सलमान खान याने ही दुचाकी सादर केली होती.

Leave a Comment