
ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय ऍथलीट विकास गौडा याने सुवर्ण पदकाची कमाई केली. विकास गौडाने पुरुष थाळीफेक स्पर्धेत अंतिम सामन्यातील तिस-या प्रयत्नात आपला सर्वश्रेष्ठ खेळ केला. विकासने सुवर्ण पदकावर 63.64 मीटर अंतरापर्यंत थाळी फेकत मोहोर उमटविली.
थाळीफेकमध्ये भारताला सुवर्ण
विकासने पहिल्या तीन प्रयत्नात एकूण 60.63, 62.09, 63.64 मीटरचे अंतर कापले. तर चौथा आणि सहावा प्रयत्न फोल ठरला तर पाचव्या प्रयत्नात 62.17 मीटर अंतर विकासच्या थाळीने कापले.
विकास याच्या सुवर्णपदकाने भारताला आतापर्यंत एकूण 13 सुवर्ण पदक मिळाले आहेत. तर एकूण पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
