कसोटी क्रमवारीत पुजारा, विराटची घसरण

combo
दुबई – भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या इंग्लंडविरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळे आयसीसी कसोटी क्रमवारीत घसरण झाली असून चेतेश्वर पुजारा या क्रमवारीत दहाव्या स्थानावर घसरला आहे तर विराटची १५ व्या स्थानावर घसरण झाली आहे.

भारताचा इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिस-या सामन्यात २६६ धावांनी पराभव झाला. या विजयामुळे इंग्लंडला १-१ अशी बरोबरी साधता आली.

विराट, पुजाराच्या क्रमवारीत जरी या पराभवामुळे घसरण झाली असली तरी मात्र अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ५४ आणि ५२ धावा करणा-या अजिंक्य रहाणेने आपल्या करिअरमधील २६ वे स्थान पटकावले आहे. तर रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार या क्रमवारीत अनुक्रमे २५ आणि ३२ व्या स्थानावर आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आम्लाने कसोटी क्रमवारीत टॉप तीन मध्ये पुन्हा एकदा स्थान पटकावले आहे. तर ए बी डिविलियसर्स पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा ८८९ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. तर इंग्लंडच्या इयान बेलने टॉप २० मध्ये स्थान मिळवले आहे.

Leave a Comment