बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा अपयश

sarita
ग्लासगो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यंदा मुष्टियुद्धात भारतासाठी निराशाजनक ठरला. मणिपूरची 32 वर्षीय एल. सरिताचा विजय मात्र याला अपवाद ठरला. एल. सरिताने महिलांच्या 57-60 किलोग्रॅम वजनगटात नायजेरियाच्या केहेंडे ओबारेहला 2-0 असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता पुढील फेरीत तिची लढत वेल्सच्या चार्लेन जोन्सविरुद्ध होईल.

पूजा राणीला महिलांच्या 75 किलोग्रॅम वजनगटात इंग्लंडच्या सॅवनाह मार्शलकडून 0-3 अशा एकतर्फी फरकाने पराभव स्वीकारावा लागला. पण, खराब पंचगिरीचा तिला चांगलाच फटका बसला. तिन्ही पंचांनी तिच्याविरुद्ध 10-9 अशा फरकाने निकाल दिला. विद्यमान जेता मनोज कुमारचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. लाईटवेट 64 किलोग्रॅम बाऊटमध्ये मनोजला इंग्लंडच्या सॅम्युएल मॅक्सवेलविरुद्ध 0-3 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लिशमन मॅक्सवेलने तिन्ही फेरीत उत्तम वर्चस्व गाजवले.

Leave a Comment