इंग्लंड हॉकीच्या उपांत्य फेरीत

hockey
ग्लासगो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इंग्लिश महिला हॉकी संघाने संघर्षपूर्ण लढतीत विजय प्राप्त करत उपांत्य फेरीत धडक मारली. इंग्लिश संघाने उपांत्यपूर्व सामन्यात स्कॉटलंडला 2-1 अशा निसटत्या फरकाने मात दिली. इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली तर सुवर्णपदकासाठी त्यांची लढत न्यूझीलंडविरुद्ध होऊ शकते. न्यूझीलंडला उपांत्य फेरीत कॅनडाचे सोपे आव्हान असणार आहे.

मलेशिया व वेल्स संघाला न्यूझीलंड व इंग्लंड या दोन्ही संघांनी नमवले असले तरी सुवर्णपदकासाठी फेवरीट मानल्या जाणा-या ऑस्ट्रेलियाकडून त्या उभयतांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. स्कॉटलंडला आता शुक्रवारी पाचव्या स्थानाच्या प्ले-ऑफ लढतीत उतरावे लागेल.

Leave a Comment