
पुणे : सध्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरून पुण्यात ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस पडणार असल्याची अफवा पसरत असल्यामुळे पुणेकरांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात ढगफुटीच्या अफवेला उधान
पुण्यात जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर आता मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून जुलै महिन्यात होणा-या पावसाची सरासरी पार होऊन आतापर्यंत 286 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. आधीच पुणेकरांमध्ये माळणी या गावात झालेल्या दुर्घटनेमुळे भीतीचे वातावरण असताना या अफवांमुळे यात आणखीच भर पडताना दिसत आहे.
पुणे वेधशाळेकडून याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई व मध्य महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
