
साउथम्पटन – इंग्लंडने तिस-या कसोटीत मोइन अलीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताचा २६६ धावांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मलिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
भारताचा तिस-या कसोटीत दारुण पराभव
बुधवारी चौथ्या दिवसअखेर इंग्लंडच्या ४४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या चारबाद ११२ धावा झाल्या होत्या. भारताची सर्व मदार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, धोनी आणि जाडेजावर अवलंबून होती.
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने चार बाद ११२ धावासंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. पाचव्या दिवशी अँडरसनने रोहित शर्मा याला सहा धावांवर बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. त्यापाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंग धोनीही केवळ सहा धावा काढून बाद झाला. त्यालाही अँडरसनने बाद केले. धोनी बाद झाला तेव्हा भारताच्या १२० धावा झाल्या होत्या. त्यानंतर तळातील फलंदाजांना अलीने एका पाठोपाठ बाद केले आणि इंग्लंडला मोठा विजय मिळवून दिला.
इंग्लंडकडून दुस-या डावात मोइन अलीने सर्वाधिक सहा गडी बाद केले तर अँडरसनने दोन तर ज्यो रुटने एक गडी बाद केला. भारताकडून अजिंक्य रहाणे यांनी नाबाद ५२ धावा केल्या.
