चिदंबरम यांची मोदी सरकारवर स्तुतीसुमने

chidambaram
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी विमा सुधारणा विधेयकावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची गंभीरता आनंददायी असल्याचे मत व्यक्त केले असून आधीच्या सरकारचे चांगले निर्णय प्रत्येक सरकारने पुर्णत्वास न्यावेत असेही चिदंबरम म्हणाले.

विमा विधेयक संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुरदर्शी नितीचा भाग असल्यामुळे चांगले परिणाम दिसून येतील असे चिदंमबरम यांनी सांगितले. विमा क्षेत्रात संपुआने 2008 मध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 26 टक्क्यांवरून वाढवून 49 टक्के करण्यासाठी विमा सुधारणा विधेयक आणले होते. मात्र अन्य राजकीय पक्षांच्या विरोधामुळे हे विधेयक पारित होऊ शकले नाही.

Leave a Comment