माझ्यासाठी कालची फायनल अपेक्षेपेक्षाही सोपी होती – सुशील कुमार

sushilkumar
ग्लासगो – यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत आपला पारंपरिक वजनगट बदलल्यानंतरही सुशीलकुमारने सुवर्णपदक काबीज केले. असून त्याने पाकच्या अब्बासविरुद्धची लढत आपल्यासाठी केकवॉक ठरली असल्य्याचे प्रतिपादन करत विजयाचा आनंद व्यक्त केला. सुशीलकुमार 74 किलोग्रॅम फ्री स्टाईलचे सुवर्ण जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलत होता.

त्याने याबाबत पुष्टी करताना सांगितले की माझ्यासाठी कालची फायनल अपेक्षेपेक्षाही सोपी होती. इतक्या सहजतेने यश मिळेल, याचा अंदाजही मी केला नव्हता. सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत सुशीलकुमारने अवघ्या 107 व्या सेकंदालाच अब्बासचा धोबीपछाड केला होता. आमचा कुस्ती संघ यंदा दर्जेदार प्रदर्शन साकारतो आहे, याचा मला विशेष आनंद आहे. ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत आम्हाला आणखी काही इव्हेंट्समध्ये देखील यश अपेक्षित आहे’, असे तो पुढे म्हणाला.

वास्तविक, सुशील यंदा आपल्या नेहमीच्या 66 किलोग्रॅम वजनगटाऐवजी 74 किलोग्रॅम या नवीन वजनगटातून मॅटवर उतरत होता. पण, वजनगट बदलल्याने आपल्याला फारशी समस्या जाणवली नाही, असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सुशीलकुमारचा प्रतिस्पर्धी असलेल्या पाकच्या अब्बासने आपण रोजे पाळत असल्याने आजच्या लढतीत पूर्ण ताकदीने लढत देऊ शकत नसल्याचे यावेळी नमूद केले.

Leave a Comment