आता छोटया उत्पादनांची खरेदीही ऑनलाईन

shopping
नवी दिल्ली : राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने ऑनलाईन शॉपिंगला मिळणारा ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून एमएसएमई शॉपिंग डॉट कॉम हे संकेतस्थळ ग्राहकांच्या सेवेत दाखल केल्यामुळे आता छोटया उत्पादनांचीही ऑनलाइन खरेदी करता येणार आहे.

या संकेतस्थळाचे उद्घाटन केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. मार्केटींग आणि वितरण यामध्येच लघु व मध्यम उद्योगांना गुरफटून रहावे लागत होते. मात्र, या संकेतस्थळाच्या माध्यमातून या कंपन्यांना थेट ग्राहकांपर्यंत सहज पोहचता येणार आहे. शिवाय ग्राहकांनाही छोटया उत्पादनांची खरेदी करणे शक्य होणार आहे.

Leave a Comment