‘देवतारी त्याला कोण मारी ‘ आईसमवेत ‘रुद्र’ला जीवदान

bal
पुणे – ‘देवतारी त्याला कोण मारी ‘ या म्हणीचा प्रत्यय माळीण गावात सर्वानी अनुभवला . निसर्गाच्या रुद्रावतारानंतरही तीन महिन्याच्या ‘रुद्र’ने निसर्गाच्या कोपावर मात करीत आईसमवेत नशीबवान असल्याचे दाखवून दिले ,रुद्र आणि त्याच्या आईला सुखरूपपणे मलब्यातून बाहेर काढण्यात आले.
माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या घटनेला ३० तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी गुरूवारी याच गावातून आई आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला सुरक्षितरित्या बाहेर काढले. या महिलेचे नाव प्रमिला लिंबे असून, मुलाचे नाव रूद्र असे आहे. बुधवारी दरड कोसळल्याने संपूर्ण गाव माती आणि चिखलाखाली सापडले आहे. प्रमिला लिंबे बुधवारी सकाळी आपल्या लहान मुलाला दूध पाजत असताना दरड कोसळल्याने ते ढिगा-याखाली सापडले. गुरूवारी संध्याकाळी साडेचार वाजता बचाव पथकाला त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. महिलेच्या पाठीला थोडा मुका मार लागला असून, मुलाला थोडं खरचटलं आहे. त्यानंतर त्यांना जवळच्याच चिंचवाडी या गावात एका घरात आश्रय देण्यात आला होता, परंतू त्रास होत असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना रूग्णवाहिकेतून मंचरला पाठविण्यात आले आहे.

या दुर्घटनेतून ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर आतापर्यंत ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अजूनही शेकडो लोक ढिगा-याखाली अडकले आहेत. असे असताना ढिगाऱ्याखाली अडकेलेल्या माय-लेकराला मृत्युच्या दाढेतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याने दु:खद प्रसंगी अनेकांच्या चेह-यावर हास्य झळकताना पहायला आहे.

Leave a Comment