दहीहंदी बालगोपाळच फोडणार

dahihandi
मुंबई – बालहक्क आयोगाने सुरक्षेच्या कारणास्तव १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यास बंदी घातली आहे. मात्र, गोविंदा मंडळांनी हा आदेश मान्य करण्यास नकार दिला असून कारवाई झाली तरी चालेल पण, बालगोपाळच दहीहंडी फोडणार अशी भूमिका गोविंदा पथकांनी घेतली आहे.

दहीहंडी समन्वय समितीची मुंबईतील परळमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच मंडळांनी यावेळी बालहक्का आयोगाच्या निर्णयाचा निषेधही नोंदवला.

Leave a Comment