अंतिम स्पर्धेत जागा बनविण्यास असमर्थ ठरला विजय कुमार

vijay-kumar
ग्लासगो – 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळविण्यात ऑलिंपिक स्पर्धेत रौप्य पदक विजेता ठरलेला नेमबाज विजय कुमार असमर्थ ठरला असून 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिल्याने अंतिम सामना खेळण्यास त्याला शक्य होणार नाही.

विजय कुमार दोन पात्रता फेरित 555 गुण मिळवून सातव्या स्थानावर राहिले. पात्रता फेरित प्रथम सहा स्पर्धकांना अंतिम सामन्यात स्थान मिळाले. यामध्ये अन्य भारतीय खेळाडू हरप्रित सिंहने पात्रता फेरित 573 गुण मिळविल्याने अंतिम सामन्यात स्थान पटकावले.

Leave a Comment