त्रिनिदाद-टोबॅगोवर भारताचे दे दणा दन गोल

hockey1
ग्लासगो – महिलांच्या हॉकीमध्ये भारताने त्रिनिदाद-टोबॅगोचा 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 14-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या तिस-या सामन्यात प्रतिस्पर्धी त्रिनिदाद-टोबॅगोला एकही गोल नोंदवू दिला नाही.

न्यूझीलंडकडून या क्रीडा प्रकारात यापूर्वीच्या सामन्यात भारताला 3-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. सामन्यातील चौथ्या मिनिटाला वंदना कटारीयाने पेनल्टी कॉर्नर्रवर भारताचे खाते उघडले. दीपिका आणि राणीने अनुक्रमे 11 व्या आणि 12 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने 9-0 अशी आघाडी मिळविली होती. पण उत्तरार्धात भारताने 5 गोल नोंदविले. जसप्रित कौरने खेळाच्या 18 व्या मिनिटाला भारताचा चौथा गोल राणीने या कालावधीतील 19 व्या आणि 25 व्या मिनिटाला असे गोल, कर्णधार रितू राणीने तसेच दीपिका आणि अनुराधा थोकचॉम यांनी प्रत्येकी एक गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने 9-0 अशी आघाडी घेतली होती. 41 व्या मिनिटाला भारताचा 10 वा गोल जसप्रित कौरने पेनल्टी कॉर्नर्रवर मारला. 48 व्या मिनिटाला जसप्रित कौरने पुन्हा पेनल्टी कॉर्नर्रवर भारताचा 11 वा गोल केला. अनुपा बर्लाने 53 व्या, दीपिकाने 64 व्या तर रितुशा आर्याने 68 मिनिटाला गोल नोंदवून त्रिनिदाद-टोबॅगोचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.