12 बँकांना ठोठावला रिजर्व्ह बँकेने दंड

rbi
मुंबई : भारतीय रिजर्व्ह बँकेने डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्सप्रकरणी आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, येस बँक समवेत 7 अन्य बँकांना दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँकेने एकूण 1.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे म्हटले आहे. आरबीआयने आयसीआयसीआय बँकेला 40 लाख रुपये आणि ऍक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेला 15-15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचबरोबर आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि येस बँकेला 10-10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँक आणि रत्नाकर बँकेला 5-5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

2013 च्या अखेरीस 12 बँकांच्या काही शाखांमध्ये डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्सचे कर्ज आणि चालू खात्याची आपण चौकशी केली होती, ज्याच्या आधारावर मार्च 2014 ला या बँकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती आणि बँकांनी लिखित उत्तर दिले होते असे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.

प्रत्येक प्रकरणाची तथ्ये आणि वेगवेगळ्या बँकांच्या उत्तरावर विचार केल्यानंतर रिझर्व्ह बँक या निष्कर्षावर पोहोचले आहे की काही नियमांचे उल्लंघन करण्यात आले ज्यामुळे या बँकांना दंड ठोठावण्यात आला.