उपभोगत्यांना इंटरनेट स्पीड सांगणे बंधनकारक

internet
नवी दिल्ली : आता उपभोगत्यांना कमीत कमी किती डाउनलोड स्पीड दिला जाणार मोबाइलवर इंटरनेट सेवा देणाऱया कंपन्यांना हे सांगावे लागणार आहे. कंपन्यांना हे देखील सुनिश्चित करावे लागणार आहे की वापरावेळी 80 टक्के वेळात तो वेग किमान डाउनलोड स्पीड मिळेल.

वायरलेस डाटा सेवांच्या गुणवत्ता मानकांमध्ये दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) संशोधन केले असून ट्रायचे नवे नियम 23 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. हे नियम 2जी आणि 3जी च्या सर्व डाटा प्लॅनसाठी लागू असणार आहेत. हे नियम मोबाइल फोनबरोबरच डोंगलसाठी देखील लागू होणार आहेत.

Leave a Comment