
मुंबई – नुकताच एक नवा बजेट फोन सँमसंगने लॉन्च केला आहे. सँमसंगचा हा स्मार्टफोन मध्यमवर्गींयाच्या आवाक्यातील असून केवळ ७३३५ रूपयांत हा फोन मिळू शकणार आहे.
सँमसंगने आणला मध्यमवर्गींयाच्या आवाक्यातील स्मार्टफोन
भारतात नुकताच सँमसंगने आपला गॅलक्सी स्टार २ प्लस लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ४.४ किटकॅटवर चालतो. ड्युअल सिमची सुविधा असलेला स्टार २ प्लसची इंटर्नल मेमरीही पॉवरफुल म्हणजे ४ जीबी आहे.
सॅमसंग गॅलक्सी स्टार २ प्लसची वैशिष्ट्ये- ड्यूल-सिम सपोर्ट, ४८०x८०० पिक्सल रेझ्युलेशन ४.३ इंच डिस्प्ले, १.२ गीगाहर्त्झ ड्यूल-कोअर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, ३ मेगापिक्सल कॅमेरा एलईडी फ्लॅश, ४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ३२ जीबी मायक्रो-एसडी कार्ड क्षमता, १८००mAh बॅटरी क्षमता, ३जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस, १२९.७x६५.९x९.४ मिमी १३८ ग्राम वजनाचा स्मार्टफोन
