राष्ट्रकुल; भारताची कुस्तीत चार पदके निश्चित

glasgow
ग्लासगो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजी, वेटलिफ्टिंग बरोबरच कुस्तीकडूनही सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे.

ऑलिंपिक रौप्यपदक विजेता सुशील कुमार आणि राजीव तोमरने अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारात (७४ किलो) उपांत्यफेरीत एम. बीबो ( नाजयजेरिया)वर ८-४ अशी मात केली. तर फ्रीस्टाइल प्रकारातील (१२५ किलो) राजीव तोमरने न्यूझीलंडच्या एम. कार्नेवर ११-१ असा विजय मिळवला. अमित कुमारनेही पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारात (५७ किलो) उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या अझर हुसैनवर १०-० असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताच्या विनेश हिने महिला (४८ किलो) कुस्ती प्रकाराच्या उपांत्य फेरीत कॅनडाच्या जे मियानला ४-१ ने नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला असून कुस्तीपटूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताची चार रौप्य पदके निश्चित झाली.

याआधी ‘राउंड ऑफ १६’ मध्ये सुशीलने ऑस्ट्रेलियाच्या जेडन लॉरेन्सचा ११-० असा धुव्वा उडवला. तत्पूर्वी, अमितने मॉरिशसचा जेजी बंडूचा पराभव केला होता.

सुशील आणि अमितने आश्वासक सुरुवात केली तरी महिला गटातील फ्रीस्टाइल प्रकारात ज्योतीचे (७५ किलो) आव्हान संपुष्टात आले.

तर दुसरीकडे नेमबाजीत ऑलिंपिक रौप्यपदक विजेता विजय कुमारला मात्र पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड रायफल पिस्तुल प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र हरप्रित सिंगने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ग्लासगो राष्ट्रकुलमध्ये विजय कुमार भारताचा ध्वजवाहक होता.

Leave a Comment