सह्याद्रीच्या कडेकपारीतील खरी शोभा, मार्लेश्वर

marleshwar
कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व धबधब्यामध्ये प्रसिद्ध असलेला मार्लेश्वरचा धबधबा. तो खूप उंचावरून कोसळत असल्याने पावसाळ्यात धोकादायक समजला जातो. तरीही सह्याद्रीच्या कडेकपारीतील निसर्गाची खरी शोभा मार्लेश्वर येथूनच पाहायला मिळत असल्याने पावसाळी पर्यटनासाठी मार्लेश्वर येथे मोठी गर्दी होत असते. ‘धारेश्वर’ असे या धबधब्याचे नाव असून आजूबाजूला अनेक छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याचे मनोहारी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारीतून पाहायला मिळते. मार्लेश्वरला गेल्यानंतर येथील धबधब्याचे दुरूनच दर्शन घेणे योग्य असून जवळ जाणे धोकादायक असल्याचे पर्यटकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सुमारे पाच तासांचा वेळ मार्लेश्वर येथील पावसाळी पर्यटन स्थळावर पुरेसा होतो. पायथ्यापर्यंत गाडी गेल्यावर पायऱ्या चढून २० मिनिटांचे अंतर पार केल्यानंतर मार्लेश्वर हे गुहा मंदिरातील देवस्थान येते. येथील गुहा मंदिराच्या कडेकपारीत असंख्य साप पाहायला मिळतात.

जवळचे रेल्वे स्टेशन: संगमेश्वर रोड- अंतर ३२ किमी
जवळचे बसस्थानक: देवरूख- अंतर १५ किमी
प्रसिद्ध पदार्थ- झुणका भाकरी, मटण भाकरी, मासे

Leave a Comment