मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात मिलान पराभूत

manchester
पीटस्बर्ग – मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱया मँचेस्टर सिटी संघाने इटलीच्या ए. सी. मिलानचा 5-1 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला.

मँचेस्टर सिटीच्या जोव्हेटिकने या सामन्यात दोन गोल केले. सामन्यातील 11 व्या मिनिटाला जोव्हेटिकने मँचेस्टरचे खाते उघडले तर 14 व्या मिनिटाला सिंक्लेअरने मँचेस्टरची आघाडी वाढविली. 23 व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीचा तिसरा गोल नेव्हासने केला. 49 व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीचा चौथा गोल नायजेरियन खेळाडू इहेनाचोने नोंदविला. मिलानचा एकमेव गोल मुंतारीने मध्यंतरापूर्वी केला. 58 व्या मिनिटाला जोव्हेटिकने स्वतःचा वैयक्तिक दुसरा तर मँचेस्टर सिटीचा पाचवा गोल नोंदवून ए. सी. मिलानचे आव्हान 5-1 असे संपुष्टात आणले.

Leave a Comment