बिग बॅश टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत खेळणार पीटरसन

piterson
मेलबोर्न – इंग्लंडचा अनुभवी फलंदाज केव्हिन पीटरसन ऑस्ट्रेलियात होणा-या आगामी क्रिकेट हंगामात बिग बॅश टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत मेलबोर्न स्टार्स संघाकडून खेळणार आहे.

गेल्या फेब्रुवारीमध्ये ऍशेस मालिकेत इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करावा लागला. यानंतर इंग्लंड संघातून पीटरसनची उचलबांगडी करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 साखळी स्पर्धेसाठी कॅमेरून व्हाईटच्या नेतृत्वाखालील मेलबोर्न स्टार्स संघाशी पीटरसनने दोन वर्षांचा करार केला आहे.

Leave a Comment