क्रोएशिया टेनिस स्पर्धेचा क्युव्हेस विजेता

Cuevas
युमेग – येथे क्रोएशिया खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना उरुग्वेच्या पाबेलो क्युव्हेसने स्पेनच्या विद्यमान विजेत्या टॉमी रॉब्रेडोचा पराभव केला. क्युव्हेसचे जुलै महिन्याच्या कालावधीत हे दुसरे विजेतेपद आहे.

क्युव्हेसने अंतिम सामन्यात रॉब्रेडोचा 6-3, 6-4 असा पराभव केला. जुलैच्या प्रारंभी क्युव्हेसने स्वीडीश खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. यावर्षी एटीपी विश्व टूर स्पर्धा जिंकणारा क्युव्हेस हा दुसरा टेनिसपटू आहे. गेल्या मे महिन्यात स्लोव्हाकियाच्या क्लिझेनने असा पराक्रम केला होता.

Leave a Comment