
पॅरिस – चालूवर्षा अखेरीस होणाऱया पहिल्या इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत प्रेंच फुटबॉल क्षेत्रातील नावाजलेला दमदार फुटबॉलपटू रॉबर्ट पिरेस दाखल होणार आहे. फ्रान्स फुटबॉल संघात पिरेसचा 1998 साली फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणा-या समावेश होता.
पहिल्या इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत पिरेस दाखल
पिरेसने युरो 2000 फुटबॉल स्पर्धा जिंकणा-या फ्रान्स संघाचे प्रतिनिधित्व केले असून या संघात फ्रान्सचे नावाजलेले फुटबॉलपटू झिदान आणि थिएरी हेन्री यांच्या समवेत पिरेसने दर्जेदार कामगिरी केली होती. फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाकडून पिरेसने आतापर्यंत 79 सामने खेळले असून त्याने 14 गोल नोंदविले आहेत. 2000 ते 2006 या सहा वर्षांच्या कालावधीत पिरेसने अर्सनेल संघाशी करार केला होता. अर्सनेलकडून त्याने 189 सामन्यांत 62 गोल नोंदविले आहेत. भारतात इंडियन सुपरलिग ही स्पर्धा ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान खेळविली जाणार असून त्यामध्ये आठ संघ भाग घेणार आहेत.
