टूर डी फ्रान्स विजेता ठरला इटलीचा निबाली

nibali
पॅरिस – व्हिन्सेंझो निबाली हा पहिला इटालियन सायकलस्वार आहे ज्याने तब्बल 16 वर्षानंतर टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे. यापूर्वी 1998 साली इटलीच्या दिवंगत पँटीनीने टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली होती.

निबालीने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांना या स्पर्धेतील 21 व्या आणि शेवटच्या टप्प्यात मागे टाकले. या स्पर्धेचे सर्वंकष जेतेपद आणि यलो जर्सीवर शेवटच्या टप्प्यातील विजयासह निबालीने शिक्कामोर्तब केला. या शेवटच्या टप्प्यात निबालीचा प्रतिस्पर्धी आणि दोनवेळा माजी विजेतेपद मिळविणा-या अल्बर्टो काँटेडरला स्पर्धा मार्गातील वळणावर दोन मिनिटांचा कालावधी घालवावा लागला. या स्पर्धेतील दहाव्या टप्प्यात काँटेडरच्या सायकलला अपघात झाला होता. फ्रान्सच्या पेरॉने दुसरे तर पिनॉटने तिसरे स्थान मिळविले. या शर्यतीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना निबाली म्हणाला की, काँटेडर आणि प्रूम हे अव्वल दर्जाचे स्पर्धक असून त्यांच्याशी पुन्हा सामना करण्याची संधी पुढीलवर्षी मला मिळेल. मान्यवरांच्या हस्ते 29 वर्षीय निबालीला आकर्षक चषक तसेच यलो जर्सी प्रदान करण्यात आली.

Leave a Comment