एटीपी टेनिस स्पर्धेचे जेतेपद इस्नेरने राखले

john
ऍटलांटा – ऍटलांटा खुल्या एटीपी टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद अमेरिकेच्या अग्रमानांकित जॉन इस्नेरने सलग दुसऱयावर्षी स्वतःकडे कायम राखले असून अंतिम सामन्यात इस्नेरने इस्त्रायलच्या डुडी सेलाचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.

इस्नेरने या सामन्यात 15 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत इस्नेरने या स्पर्धेत चारवेळा अंतिम फेरी गाठली. इस्नेरला 2010 साली अमेरिकेच्या फिशकडून अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली होती. 2011 साली पुन्हा इस्नेर या स्पर्धेत उपविजेता ठरला. गेल्यावर्षी इस्नेरने द. आफ्रिकेच्या ऍन्डरसनचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते.

Leave a Comment