
ग्लासगो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पुरुषांच्या 77 किलोग्रॅम भारत्तोल्ल्नमध्ये एक सुवर्ण व 1 रौप्य पदकाची कमाई करत नवा इतिहास रचला. सतीश सिवलिंगमने स्नॅचमध्ये नवा विक्रम नोंदवताना सुवर्णपदक संपादन केले तर रवी कतूलु रौप्य पदकाचा मानकरी ठरला.
सतीशला सुवर्ण, रवी कतूलुला रौप्य
22 वर्षीय सतीशने एकूण 328 किलोग्रॅम (141-179) वजन उचलत 2010 राष्ट्रकुल सुवर्णजेत्या रवीला पिछाडीवर टाकले. रवी कतूलुने 317 किलोग्रॅम वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केली. ऑस्ट्रेलियाच्या प्रॅन्कोईस इतौदीने 314 किलोग्रॅम (137-177) वजन उचलत कांस्यपदक पटकावले. सतीशने 149 किलोग्रॅम वजन स्नॅच लिफ्टमध्येच नोंदवले व नौरुचा दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील युको पीटरसचा 148 किलोग्रॅम वजनाचा विक्रम मोडित काढला. भारताने आता भारत्तोल्ल्नमध्ये दिल्लीतील कामगिरी (2 सुवर्ण, 2 रौप्य, 4 कांस्य) मागे टाकली. यंदा संघाने वेटलिफ्ंिटगमध्ये 3 सुवर्ण, 2 रौप्य व 4 कांस्यपदकाची कमाई केली आहे.
