
काबूल – कंदहारमध्ये एका आत्मघातकी हल्लेखोराने अफगाणिस्तानचे मावळते राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांचे चुलत बंधु हशमत करझई यांची मंगळवारी सकाळी हत्या केली.
अफगाणिस्तान राष्ट्राध्यक्षांच्या भावाची हत्या
हशमत करझई यांची त्यांच्या घरामध्ये हत्या करण्यात आली. हशमत यांच्या घरी ईद असल्याने शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण आले होते. यावेळी पाहुणा बनून आलेल्या आत्मघातकी हल्लेखोराने हशमत यांची गळाभेट घेताना स्फोटामध्ये स्वत:ला उडवून घेत त्यांची हत्या केली.
कंदहार प्रांताच्या राज्यपालांच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली की हल्लेखोराने फेटयामध्ये लपवून स्फोटके आणली होती. हशमत करझई हे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे अश्रफ घानी यांचे कंदहारमधील प्रचार व्यवस्थापक होते.
