ठाणे जिल्ह्यात अनेक गावांचा तुटला संपर्क

flood
वसई- ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले असून वसई-विरार पासून डहाणू परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क नद्यांना पूर आल्याने तुटला आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने वसई-विरार परिसरातील रिक्षा वाहतूक बंद आहे.

पालघरमधील सुर्या नदीला पूर आल्याने मासवण पुल पाण्याखाली गेल्याने २५ गावांचा संपर्क तुटला आहे. तानसा नदीला पूर आल्याने भाताने पूल पाण्याखाली गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला आहे. वैतरणा नदीला पूर आल्याने त्याखालील सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत.

पुलांवरुन पाणी जात असल्याने शिरसाट फाटा ते वज्रेश्वरी या दरम्यान भिवंडी मार्गावरील वाहतूक बंद आहे. वेगवेगळ्या भागातून सुमारे १५० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र अद्यापही १०० हून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विरारमधील पश्चिम येथील गोकूळ टाऊनशीप, विवा कॉलेज भागात पाणी भरले आहे. आगाशी- विरार रस्त्यावर पाणी साचल्याने रिक्षा वाहतूक बंद आहे. नालासोपारा शहरातही पाणी तुंबले आहे. यामुळे रस्ते वाहतूक विस्क​ळीत झाली आहे.

Leave a Comment