महायुतीच्या जागावाटपाची बैठक आज

mahayuti
मुंबई – महायुतीची मुंबईत सोमवारी जागावाटपाची बैठक होत असून रिपाइं, स्वाभिमानी, शिवसंग्राम आणि ‘रासप’ नेत्यांच्या जागांच्या मागणीचा आकडा किमान 50 जागांवर जाणार असल्याने काँग्रेस-राष्‍ट्रवादीप्रमाणे महायुतीतसुद्धा जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ‘रिपाइं’ने आपल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यात 50 नावे असून बैठकीत किमान 30 मतदारसंघांची मागणी रामदास आठवले करण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई या विभागांतील मतदारसंघांवर ‘रिपाइं’चा प्रामुख्याने डोळा आहे.

Leave a Comment