पदक विजेत्यांचे राष्ट्रपतींनी केले अभिनंदन

pranav
नवी दिल्ली – ग्लासगो येथे सुरु असलेल्या 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारोत्तोलन आणि ज्युडो स्पर्धांमधील पदक विजेत्या खेळांडूचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिनंदन केले आहे.

संजिता खुमूकचम, सुखेन डे, नवजोत चाना, सुशिला लिकमाबाम, मिराबाई चानू सैखोम, कल्पना थौडोम आणि गणेश माळी यांना पाठवलेल्या वैयक्तिक संदेशात राष्ट्रपतींनी सांगितले आहे की, “राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये आपला राष्ट्रध्वज उंच फडकवत ठेवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आहे. भविष्यातील यशाबद्दल माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.”

Leave a Comment