कानडींचा महाराष्ट्र द्वेष ; ‘तो’ चौथरा तोडला

border
बेळगाव – सीमा भागातील अस्मितेच्रे प्रतिक समजल्या जाणार्‍या आणि गेल्या 56 वर्षांपासून येळ्ळूर गावाच्या वेशीवर डौलान फडकणार्‍या महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा चौथरा कन्नड सरकारने पोलिसी दडपशाही आणि बळाचा वापर करून काढून टाकला आहे. यामुळे बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या 56 वर्षांपासून बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावच्या वेशीवर महाराष्ट्र राज्य येल्लूर हा चौथरा डौलान फडकत होता मात्र पोटशूळ उठल्याने कानडी सरकारने सीमा भागातील मराठीचे अस्तित्वच संपण्याचा विडा उचलला आहे. गोकाकमधील भिमाप्पा गडाद नावाच्या एकाने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानुसार जिल्हा प्रशासनाला सोमवार 28 ऑगष्ट रोजी चौथरा हटवून न्यायालयासमोर म्हणणे मांडायचे होते. त्यानुसार बेळगाव जिल्हा प्रशासनाने हा मराठी अस्मितेचा फलक काढला आहे .शुक्रवारी सकाळी अचानक जिल्हा प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा फलक हटवला.

Leave a Comment