फेसबुकचे मोबाईल युजर ४० कोटींवर

fb
फेसबुक या सोशल नेटवर्क साईटच्या दुसर्‍या तिमाहीचे निकाल अतिशय उत्साहवर्धक लागले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जगात ४० कोटु अॅक्टीव्ह युजर फेसबुक स्मार्टफोनवर अॅक्सेस करत असल्याचे दिसून आले आहे. ही संख्या फेसबुकच्या एकूण युजरच्या ३० टक्के इतकी आहे. फेसबुकचे ३० जूनपर्यंत एकूण उत्पन्न २.९१ अब्ज डॉलर्सवर गेले असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग च्या म्हणण्याप्रमाणे फेसबुकचे निकाल चांगले आहेत. आमच्या युजरची संख्या वाढत चालली असून लवकरच आम्ही सर्व जगाशी जोडले जाऊ अशी आशा आहे. सध्या फेसबुकचे जगभरात १.३ अब्ज युजर असून त्यातील १० कोटी भारतीय आहेत.

Leave a Comment