एअर अल्जेरियाचा मलबा सापडला – सर्व ११६ प्रवासी ठार

algeria
एअर अल्जेरियाचे एएच ५०१७ विमान मालेजवळ कोसळल्याचे उघड झाले असून या विमानाचा मलबा मालेजवळ मिळाला आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि विमानाचा क्रू असे ११६ जण ठार झाले असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. हे विमान बुर्कीनो फासोकडून अल्जेरियाला निघाले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर ५० मिनिटांत त्याचा रडारशी संपर्क तुटला होता.

मिळालेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे या विमानाचा मार्ग बदलण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतर लगेगच विमान रडार वरून दिसेनासे झाले. मालेपासून ७० किमीवर ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचे शोधानंतर समजले. विमानात फ्रान्सचे ५१, लेबनन चे ८, अल्जिरीयाचे ४, लक्गमबर्गचे २ तर बेल्जियम, स्वित्झर्लंड, नायजेरिया, कॅनडा, युक्रेन, रोमानियाचा प्रत्येकी १ नागरिक होते. विमानाचा क्रू स्पेनचा होता.

Leave a Comment