अल्जेरियन विमान बेपत्ता;नदीत कोसळल्याची शक्यता

flight
अलजियर्स : एअर अलजेरी विमान कंपनीचे एक विमान बुरकिना फासोहून अलजेरियाची राजधानीला जाताना बेपत्ता झाले आहे. या विमानात फ्रेंच आणि स्पॅनिश नागरिक मोठ्या प्रमाणावर होते. एअर अलजेरीचे विमान नायझेर नदीत कोसळले असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

या विमानाशी अखेरचा संपर्क माली देशातील गाओवरुन जात असताना झाला होता. मॅकडोनेल डग्लस एमडी-83 बनावटीचे हे विमान एअर अलजेरीने स्पॅनिश कंपनी स्विप्टएअरकडून लीजवर घेतले होते . या विमानातील वैमानिक आणि सर्व कर्मचारी स्पॅनिश असल्याचे स्पेनच्या एअरलाईन्स पायलट संघटना सेपियाने म्हटले आहे.तर स्विफ्टएअरने विमान बेपत्ता झाले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुरकिना फासोच्या राजधानीतून उड्डाण केल्यानंतर अवघ्या एक तासातच हे विमान बेपत्ता झाले. मागच्या आठवड्यात मलेशियन एअरलाईन्सच्या एका विमानाला युक्रेनमधील रशियन बंडखोरांनी क्षेपणास्त्रांनी पाडलं होते . त्यात 298 जणांना आपले प्राण गमवावे लागले.तर कालच तैवानमध्ये एअर एशियाचं एक विमान खराब हवामानामुळे लँडिंगच्या प्रयत्नात दुर्घटनाग्रस्त झाले होते .

Leave a Comment