तेलंगणच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी नको पाकची सूनबाई

sania
हैदराबाद : तेलंगणशी टेनिसपटू सानिया मिर्झाचे काही घेणे-देणे नाही आणि ती पाकिस्तानची सून आहे, असे म्हणत तेलंगण राज्याच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मण यांनी निषेध केला आहे. लक्ष्मण यांनी तेलंगण राष्ट्र समितीने ग्रेटर हैदराबाद नगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर अल्पसंख्याकांची मने वळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोपही केला आहे.

तेलंगण सरकारने सानिया मिर्झाला एक कोटीची आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच तेलंगणाची ब्रँड अँम्बेसेडरही सानिया मिर्झाला बनविण्यात आले आहे.

राज्याला स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण होण्याअगोदर जाहीर करण्यात आलेल्या या मदतीचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच सानिया एका श्रीमंत कुटुंबातील असून काही वर्षांपूर्वीच तिने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केले आहे. असे करून सरकार बाकु खेळाडूंकडे कानाडोळा करत आहे, असेही लक्ष्मण यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment