राष्ट्रकुल स्पर्धेचा ग्लास्गोमध्ये भव्य उद्घाटन सोहळा

g

g1

g2
ग्लास्गो : बुधवारी रात्री मोठय़ा उत्साहात ग्लास्गोच्या सेल्टिक पार्क फुटबॉल स्टेडियममध्ये विसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.

राष्ट्रकुल स्पर्धेचे शुभारंभ होत असल्याचे ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी जाहिर केले. कार्यक्रमात सॉटलैंडची परंपरा आणि संस्कृतीचे असे दर्शन झाले, की पाहणारे मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी सेल्टिक पार्कमध्ये इंग्लडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर ऍलेक्स सॅलमॉण्ड यांच्यासह तब्बल 40 हजार लोक उपस्थित होते. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उपस्थित राहून भारतीय खेळाडूंमध्ये नवी जान आणली.

मोठय़ा उत्साहात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यानंतर आजपासून पुढील 11 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. यात बोल्ट, फराह, कॉट्स आणि अन्य विदेशी खेळाडूंसह भारताकडून सुशील कुमार, विजेंद्र कुमार, अभिनव बिंद्रासोबत अजून 212 खेळाडू सर्वस्व पणाला लावून पदक मिळवण्याचा प्रयत्न करतील. यावेळी 261 पदकांसाठी तब्बल 4229 खेळाडू मैदानात उतरणार आहेत.

Leave a Comment