शारापोव्हाचा क्रिकेटशी संबंध नाही, त्यामुळे ती मला ओळखत नाही – सचिन

sachin
नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रशियाची स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाने केलेल्या टिप्पणीवर मौन सोडले असून, शारापोव्हाचा क्रिकेटशी संबंध नाही, त्यामुळे ती मला ओळखत नसल्याची प्रतिक्रिया सचिनने दिली आहे. शारापोव्हाने जेव्हा विम्बल्डनमधील सामन्यानंतर वार्तालापप्रसंगी बोलताना सचिन तेंडुलकर कोण आहे, असा तिने सवाल केल्यानंतर तेंडुलकरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कडवी प्रतिक्रिया नोंदविली होती़ तेंडुलकर विम्बल्डनदरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉससोबत रॉयल बॉक्समध्ये उपस्थित होता.

Leave a Comment