मुंबई मॅरॅथॉनच्या नोंदणीला सुरुवात

mumbai-marathon
मुंबई- राज्यपाल के. शंकरनारायणन आणि ब्रँड अँबॅसॅडर जॉन अब्राहमच्या प्रमुख उपस्थितीत स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॅथॉनच्या स्पर्धक नोंदणीला सुरुवात झाली.

यावेळी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे विभागीय मुख्य कार्यकारी (भारत आणि दक्षिण आशिया) सुनील कौशल, महापौर सुनील प्रभू, पोलिस सहआयुक्त (वाहतूक) डी. के. उपाध्याय, अतिरिक्त पोलिस आयुक्त कृष्णा प्रसाद, सुमीत सिंगला, विशाल झुनझुनवाला, देवेंद्र बर्मा, गौरव राजपूत, प्रवीण सिन्हा तसेच प्रोकॅम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंग आणि सहव्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

१८ जानेवारी २०१५ रोजी मुंबई मॅरॅथॉनची १२वी आवृत्ती होत आहे. या मॅरॅथॉनसाठीच्या मुख्य मॅरॅथॉन, अर्ध मॅरॅथॉन तसेच पोलिस कपसाठी स्पर्धक नोंदणीला मंगळवारपासून सुरुवात झाली.

Leave a Comment