‘लोटस पार्क’ इमारतीच्या मालकाविरूध्द गुन्हा दाखल

loyus
मुंबई : अखेर पाच दिवसानंतर अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेल्या आगीप्रकरणी इमारत मालक आणि सोसायटी विरोधात अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी मंगळवारी रात्री आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मागच्या आठवड्यात लोटस बिझनेस पार्क या इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीचा 21वा मजला जळून खाक झाला होता. तसेच अन्य मजल्यांनाही आगीच्या झळा बसल्या होत्या. आग विझविताना एक जवान शहीद झाला होता. या हलगर्जीपणाला अग्निशमन दलाने इमारत मालक आणि सोसायटीला जबाबदार धरले आहे.

Leave a Comment