
पॅरिस : फ्रांसमधल्या त्राइज भागात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार बालकांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत.
फ्रांसमध्ये भीषण अपघात; सहाजणांचा मृत्यू
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉट्रांजेस गावात काल एक मिनी बस भरधाव वेगात अचानक उलटया दिशेने रस्त्यावर आली. त्याचवेळी समोरून येणाऱया मालमोटारीला मिनीबसने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील चार बालकांसह चालक व अन्य ऐकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेली बालके 11 ते 13 वयोगटातील आहेत.
